🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : ये देश नारे पे नही…भाईचारे पे चलता है”. असे ट्वीत करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. र्देशात सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी कायद्याच्या मुद्द्यावरून आव्हाड यांनी भाजपच्या समर्थकांवर टीका केली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “भक्तांची मूळ अडचण ही आहे की, कधी नव्हे ते आंदोलक जात, धर्म बाजूला ठेवून तिरंगा, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान हातात घेऊन आंदोलनात उतरलेत. आता धार्मिक हिंसा भडकवता येत नाही. ये देश नारे पे नही…भाईचारे पे चलता है”.
भक्तांची मूळ अडचण ही आहे की, कधी नव्हे ते आंदोलक , तिरंगा , बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधान हातात घेऊन आंदोलनात उतरलेत….
जात धर्म बाजूला ठेवून
आता धार्मिक हिंसा भडकवता येत नाही.
:
ये देश नारे पे नही
भाईचारे पे चलता है #CAAJanJagran— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 24, 2019
दरम्यान, देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबत (एनआरसी) संसदेतच नव्हे, तर मंत्रिमंडळातही चर्चा झाली नाही असे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रामलिला मैदानात दिले होते. मात्र या विधानाने त्यांनी देशभर ‘एनआरसी’ राबवण्याच्या गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याला त्यांनी छेद दिला. मात्र या कायद्यातील सुधारणांना त्यांनी समर्थन देत दिले आहे. ते म्हणाले, सुधारित नागरिकत्व कायदा कुणाचेही नागरिकत्व काढून घेण्यासाठी नाही, तर शेजारी देशांतील छळग्रस्त अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचा हक्क देण्यासाठी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1209419567086231552?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1209420430399770624?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
