टीम महाराष्ट्र देशा : राज्यातील जनतेला आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. तसेच सगळेच पक्ष आता मोर्चेबांधणी करण्यात व्यस्त आहेत. संभाव्य उमेदवारही आता जनतेला आश्वासने द्यायला लागले आहेत.
अशातच चांगदेव गीते अशा एका तरुणाने सोशल मीडियावर विधानसभा निवडणुका लक्षात घेत स्वतःच प्रचार करायला सुरुवात केली आहे. अशातच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक उमेदवार हे आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर याच उमेदवारांना दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. परंतु चांगदेव जे आश्वासन देणार आहे, ते तो बॉण्ड पेपरवर लिहून देणार आहे.

चांगदेव गीते यांनी याविषयी बोलताना ‘आमदारांना भरघोस पगार आणि इतर सोयीसुविधा मिळतात. पण मला निवडून दिल्यास मी पगारातील ३० हजार रुपयेच वेतन म्हणून स्वीकारेल. तर उर्वरित रक्कम ही पब्लिक खात्यात जमा करेन अस विधान केले आहे.
तसेच ‘निवडणुका म्हटल्यावर पैसेवाटप, दारू-बिर्याणीची पार्टी, असे विविध आश्वासन देऊन मतदाराला आकर्षित केलं जातं. पण मी पडलो तरी हरकत नाही, पण कोणाला दारू पाजणार नाही असंही चांगदेव गीते यांनी म्हटले आहे.
‘भाजपात अनेकांना यायचे आहे, मात्र आम्ही तावूनसुलाखून मोजक्यांनाच घेत आहोत’
बेरोजगारांसाठी खुशखबर; राज्य सरकारकडूनही १० लाख नोकऱ्या होणार उपलब्ध

