Share

आणि चक्क भाजपच्या ‘या’ नेत्याने केला मनसेत प्रवेश

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकार विरोधात आवाज बुलंद करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा युवकांवर मोठा प्रभाव आहे. रोज भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी विविध पक्षातील नेत्यांची मोठी रांग लागलेली असते मात्र आज याच्या उलट चित्र पहायला मिळाले आहे.

आगामी लोकसभा निवडणूकीतून मनसेने माघार घेतली असली तरी विधानसभेच्या दृष्टीकोनातून पक्षाची जोरदार हालचाल सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसेमध्ये इनकमिंग सुरू झाले आहे. गुरूवारी अमरेडचे भाजप नगरसेवक आणि युवा मोर्चाचे मनोज बावनगडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला.

ठाणे-पालघर या भागातील विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिका-यांनी कृष्णकुंजवर मनसेत प्रवेश केला. दिवा, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, वसई-विरार येथील विविध पक्षांच्या शेकडो कार्यकर्त्यांनीदेखील यावेळी प्रवेश केला.

दरम्यान,मनसेसाठी प्रतिकूल असणारी कॉंग्रेस देखील आपली भूमिका बदलताना दिसत आहे. महाआघाडीमध्ये मनसेला घेण्यास विरोध करणारी कॉंग्रेसच्या लक्षात आता मनसेची ताकत आली आहे अशी चिन्ह दिसू लागली आहेत.आता काँग्रेसवालेच सांगताहेत की राज ठाकरेंची सभा घ्या, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!