🕒 1 min read
बेलारूस: रशियन सैन्याने युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये हल्ले तीव्र केले आहेत. दोन्ही देशांमधील युद्धाचा आज 12 वा दिवस असून दोन्ही देशांमधील संघर्ष वाढत आहे. खार्किवमधील अनेक निवासी भागांवरही रशियन सैन्याने हल्ले केले आहेत. दरम्यान, आज दोन्ही देशांचे शिष्टमंडळ चर्चा करणार आहेत. रशियाचे एक शिष्टमंडळ युक्रेनियन शिष्टमंडळाशी चर्चेसाठी बेलारशियन शहर ब्रेस्ट येथे आले आहे. ही माहिती देताना आरआयए या वृत्तसंस्थेने सांगितले की, ही बैठक कुठे आणि केव्हा होणार याचा खुलासा केलेला नाही. आजच्या चर्चेत युद्धबंदीबाबत चर्चा होऊ शकते. दोन्ही देशांमधील चर्चेची ही तिसरी फेरी आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या चर्चेत, दोन्ही बाजूंनी काही युद्ध क्षेत्रांमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मानवतावादी कॉरिडॉर उघडण्यास सहमती दर्शविली. परंतु याबाबतचे काम अद्यापही सुरू झाले नाही.
रशिया-युक्रेन युद्ध
युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या हवाल्याने म्हटले आहे की, रशियाने मायकोलायव्हला रात्रीच्या वेळी लक्ष्य केले. येथील निवासी भागावर रॉकेटने हल्ला करण्यात आला. त्यांनी खार्किव आणि आसपासच्या भागांवर हल्लेही केले आहेत. त्याचा लष्करी दृष्टिकोनाशी काहीही संबंध नाही, तो केवळ दहशत निर्माण करण्याचा भाग आहे, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी चर्चा केली. हा संवाद सुमारे 50 मिनिटे चालला. दोन्ही नेत्यांनी युक्रेनमधील ताज्या परिस्थितीवर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेन आणि रशियन संघांमधील चर्चेच्या स्थितीबद्दल माहिती दिली. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना झेलेन्स्की यांच्याशी बोलण्याची विनंती केली. रशियाने नुकतीच युक्रेनच्या चार शहरांमध्ये युद्धबंदीची घोषणा केली असून, त्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
