Share

चोरट्यांनी दुचाक्या लांबविल्या: चोरांना पकडण्यात पोलिस अपयशी

Published On: 

औरंगाबाद: शहरातील विविध भागांतून पाच दुचाकी चोरट्यांनी लांबविल्या. याप्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहानुरमिया दर्गा परिसरात मोतीलाल काकडे यांनी एमएच २० बीव्ही ८१९१ ही आणि दुसरी आणखी दुचाकी एमएच २२ बीबी २९२५ ही उभी करून ठेवलेली असताना चोरून नेली. याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवनाथनगर येथील रहिवासी सुनील अर्जुन ढवारे यांनी घराबाहेर उभी करून ठेवलेली दुचाकी एमएच २० सीके ७३३७ चोरीस गेली. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संजयनगर परिसरात एका महिलेने घरासमोर उभी करून ठेवलेली एमएच २० बीयू ६०४८ ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तसेच रेल्वेस्टेशन रोडवरील लक्ष चेंबर्स येथे रवींद्र भिसे यांनी आपली एमएच २० सीसी ०८६३ या क्रमांकाची दुचाकी उभी करून ठेवली होती. ती अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेची नोंद वेदांतनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली. सुमारे एक महिन्यांपूर्वी समर्थनागर भागात दुचाकी चोरी करीत असताना एक चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता. त्याला शोधण्यास पोलीस आद्यप यशस्वी झालेले नाहीत. या चोरट्यांना जे ओळखत असतील त्यांनी शहरपोलिसांशी संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!