Share

यांना माहित नाही पवारांनी देखील ऊसासाठी अमित शहांनाच पत्र लिहिलेलं; फडणवीसांचा राऊत-ठाकरेंना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: शनिवारी आणि रविवारी सामनाचे कार्यकारी संपादक व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घेतलेली मुलाखत प्रदर्शित करण्यात आली. त्यात संजय राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी फडणवीसांसकट भाजपावर टीका केल्याचे दिसून आले. यावर आता फडणवीसांनी देखील आज या टिकांचा खरपूस समाचार घेतला आहे.

काल प्रदर्शित झालेल्या भागात संजय राऊत यांनी, ‘फडणवीसांनी दिल्लीला जाऊन अमित शहांची भेट घेतली , याच कारण त्यांनी साखरेच्या प्रश्नासंदर्भात चर्चा केल्याचे सांगितले. साखरेचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अंतर्गत येत नाही का? शहांचं काय काम?, यावर ठाकरेंनी, ‘साखर तर घरातच असते, गृहमंत्री म्हणजे होम-मिनिस्टर आदेश भाऊजी’ अशी काहीही खिल्ली उडवली होती.

स्टेअरिंग ठाकरेंच्या हातात असलं तरी कुठं जायचं हे मागे बसलेले ठरवतात: देवेंद्र फडणवीस

आज देवेंद्र फडणवीस यांनी यावर, ‘ आमचे विचार पटो अथवा नाही, पण मला माहिती आहे की ते विद्वान आहेत. विद्वान आहेत ते तीन की चारवेळी राज्यसभेचे सदस्य आहेत. त्यांना सर्व कल्पना आहेत, पण ते प्रश्न विचारतात, का हो, साखरेचा प्रश्न घेऊन गृहमंत्र्यांकडे कशासाठी गेले? त्याला आमचे मुख्यमंत्री उत्तर देतात, साखर तर घरातच असते, गृहमंत्री म्हणजे आमचे घराचे मंत्री म्हणजेच आदेश भावोजी. काय चाललंय? अरे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना माहिती असू नये, की या राज्यातला जो सर्वात मोठा साखर उद्योग आहे, या उद्योगाच्या पुनरुजीवनासाठी मंत्रिगट तयार झाला आहे, त्या मंत्रिगटाचे प्रमुख अमित शाह आहेत.

भारत सरकारकडून चीनवर दुसऱ्यांदा ‘डिजिटल स्ट्राइक’! अजून 47 अॅप्स केले बॅन

त्यांना भेटल्याशिवाय साखर उद्योगाला मदत मिळू शकत नाही. तसेच, ‘शरद पवारसाहेब यांनी देखील जे पत्र दिलं आहे ते पंतप्रधानांना लिहिलेलं नाही, ते कृषीमंत्र्यांना लिहिलेलं नाही किंवा ते आदेश भावोजींनाही लिहिलेलं नाही, त्यांनी ते पत्र भारताचे गृहमंत्री अमित शाह यांना लिहिलं आहे.’ त्यामुळे आता पवारांचा दाखल देत पलटवार फडणवीसांनी केला असून ठाकरे वा राऊत यावर काय प्रतिक्रिया देतात हे देखील राजकीय दृष्ट्या महत्वाचं आहे.

‘तुकाराम मुंढेंनी नागपूर सोडावे यासाठी आम्ही त्यांच्या मागे लागलेलो नाही’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!