Share

ही तर मोदी सरकारच्या कर्माची फळं; शिवेसनेचा भाजपवर घणाघात!

Published On: 

मुंबई:- केंद्र सरकारने केलेला कृषी कायदा रद्द व्हावा यासाठी गेल्या दोन आठवड्यांपासून राजधानी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. बैठका झाल्या तरीही सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. यामुळे शेतकरी आंदोलनाचा स्फोट होईल, ही तर सरकारच्या कर्माची फळ असल्याची टीका शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप सरकारवर करण्यात आली आहे. इतकंच नाही तर ८ डिसेंबरचा भारत बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस अशीही टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

दरम्यान, 10 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काढणार आहेत. त्यावेळी जुन्या संसद भवनावर धडप घालू पाहणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार अश्रुधूर आणि बंदुका चावणार का? असा थेट सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे. प्रकाशसिंग बादल, शरद पवार यांच्यासारख्या मान्यवर शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्याचे सौजन्य सरकारने दाखवलं असतं तर आजची कोंडी थोडी सैल झाली असती. आज परिस्तिथी बिघडत चालली आहे. ही सरकारच्याच कर्माची फळे आहेत अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा हक्क आहे. त्याच हक्काने ते दिल्लीत ठामपणे आंदोलन करत आहेत. त्यांना जे कृषी कायदे जुलमी वाटत आहेत, ते मागे घेण्यात सरकारलाही कमीपणा वाटण्याचे कारण नाही. किंबहुना, तो मनाचा मोठेपणाच ठरेल. शेतकरी संघटनांनी हिंदुस्तान बंदची हाक दिली आहे. हा बंद कडकडीत व्हावा अशी तयारी सुरू आहे. त्यामुळे ८ डिसेंबरचा हा बंद यशस्वी झाला तर मोदी सरकारला ती शेतकऱ्यांची नोटीस असेल अशी घणाघाती टीका सामनातून करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!