Share

टी-२० सामन्यामधील भारताच्या विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला….

Published On: 

ऑस्ट्रेलिया : भारतीय संघानं दुसऱ्या टी-२० सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका आपल्या नावे केली. रोहित शर्मा, शामी आणि बुमराहसारख्या दिग्गज खेळाडूंशिवाय भारातानं हा विजय मिळवल्यामुळे सर्वांना सुखद धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या विजयानंतर सलामिवीर फलंदाज रोहित शर्मानं ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्मानं आपल्या ट्विटमध्ये भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.

आयपीएलमध्ये मुंबई संघाचं नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्माला दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरोधाती मर्यादित सामन्याच्या मालिकेला मुकावं लागलं होतं. भारतीय संघानं टी-२० मध्ये मिळवलेल्या विजयावर रोहित शर्मानं प्रतिक्रिया दिली. रोहित शर्मा आपल्या ट्विटमध्ये म्हणाला, ‘भारतीय संघासाठी या मालिकेत हा सर्वात मोठा विजय आहे. ज्या अंदाजात भारतीय संघानं विजय मिळवला पाहून आनंद झाला. प्रत्येकाचं अभिनंदन.’

रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यासांरख्या प्रमुख खेळाडूंशिवाय खेळतानाही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या भूमीत टी-२० मालिकेत धूळ चारल्यामुळे मी आनंदित आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहलीनं सामन्यानंतर सांगितलं. ” टी-२० मालिकेत संघ बांधणी योग्य प्रकारे जुळून आली आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांसारखे आमचे मर्यादित षटकांच्या सामन्यातील प्रमुख खेळाडू या मालिकेत संघाचा भाग नव्हते.

तरीही ऑस्ट्रलियाला पराभूत केल्यामुळे मी समाधानी आहे, असं कोहली म्हणाला.’ हार्दिक आता एक परिपक्व खेळाडू म्हणून उद्यास आला आहे. त्यानं सामाना जिंकवूनच पॅव्हेलियनमध्ये परतावे, अशी अपेक्षा संघाला आहे. त्यामुळे ही खेळी त्याला स्वत:लाही सुखावणारी असेल, याची मला खात्री आहे. त्याशिवाय नटराजनच्या समावेशामुळे गोलंदाजांच्या फळीत विविधता निर्माण झाली आहे, असेही कोहलीनं सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!