🕒 1 min read
मुंबई : लखीमपूर हिंसाचाराच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सरकारने 11 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यांनी, मंत्र्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यांच्या टीकेला भाजपही सडेतोड उत्तर देत आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोध केला आहे.
लखीमपुर ची घटना निषेधार्थ आहेच. परंतु आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून राजकीय भाकरी भाजायला उत्तर प्रदेश मधील घटनेवर महाराष्ट्र बंद म्हणून आम्ही महाभकास आघाडी सरकारचा 11 ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र बंदचा विरोध करतो, असं सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
लखीमपूर हिंसाचाराची घटना दुर्दैवीच. त्यासंदर्भात दोषींना फासावर लटकलं पाहिजे. महाराष्ट्रात शेतकरी रोज नविन संकटांना सामोरे जात असताना महाभकास आघाडीने पुकारलेल्या बंदला विरोध करतो, असं म्हणत महाविकास आघाडीवर ताशेरे ओढले आहेत.
#लखीमपुर ची घटना निषेधार्थ आहेच
परंतु आपल्या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यायचा सोडून निघाले शेजाऱ्याच्या तव्यावर भाकरी भाजायला
म्हणून आम्ही महाभकास आघाडी सरकारचा 11 ऑक्टोंबरच्या महाराष्ट्र बंदचा विरोध करतो..#शेतकरी_वाचवा #isupportfarmers #maharashtra pic.twitter.com/szycxwkRky
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) October 10, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं झालेल्या हिंसाचार प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या हिंसाचारात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना 45 लाख रुपये नुकसानभरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. जखमी झालेल्यांना 10 लाख रुपये दिले जाणार आहेत. रविवारी झालेल्या या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

