Share

‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : क्रूज पार्टीवरील छापा हा बनावट असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. ‘ज्या दिवशी क्रूझवर एनसीबीने छापे टाकले त्यावेळी समीर वानखेडे यांनी ८ ते १० लोकांना ताब्यात घेतले असे म्हटले होते. एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतले होते आणि नंतर आठ लोकांना ताब्यात घेतल्याच्या बातम्या आल्या,’ असा गौप्यस्फोट मलिक यांनी केला आहे. ‘दिल्ली ते मुंबईतील भाजप नेत्यांनी फोन केले. या सगळ्या कटात भाजपचे नेते सहभागी असल्यानं त्यांच्या नातेवाईकांना सोडलं. समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईत अनेकांना पकडण्यात आलं होतं. यात जे लोक क्लीन होते. त्यांचा कशातच सहभाग नव्हता अशा लोकांना सोडून देण्यात आलं. ज्या लोकांकडे काही सापडलं होतं. त्यांनाच एनसीबीनं पकडल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच ‘ड्रग्ज ही समाजाला लागलेली कीड आहे. तरुण पिढीचे त्यातून मोठे नुकसान होते आहे. अशात एखादी संस्था ठोस कारवाई करीत असेल तर त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याची गरज. जे सोडले त्यात राष्ट्रवादीशीही संबंधित. पण, त्याला बदनाम करणे अयोग्य! एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.

तर दुसरीकडे, एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मलिकांनी केलेले आरोप फेटाळून लावत स्पष्ट भूमिका मांडली आहे. ही पत्रकार परिषद एनसीबी अधिकारी समीर वानखेडे तसंच एडीजी ज्ञानेश्वर सिंग यांनी घेतली आहे. एकूण 14 जणांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन आणलं गेलं. यापैकी 6 जणांना पुराव्या अभावी सोडून देण्यात आले, असं एनसीबीनं मलिकांच्या आरोपावर उत्तर दिलं आहे. तसंच सोडण्यात आलेल्या 6 जणांची नावे देता येणार नाही असं सांगत प्रकरण कोर्टात सुरु आहे, अशी माहिती एनसीबीनं दिली आहे. 1 तारखेच्या कारवाई नंतर 6 ठिकाणी छापे टाकले गेले. या कारवाईत 10 जणांना अटक केली. एनसीबीचे काम निष्पक्ष केले जाते, असं म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!