मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा आज ८१ वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक उपक्रम दरवर्षी राबवले जातात. वाढदिवसानिमित्त आज मुंबईत कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली तसेच देशभरातून शरद पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात शरद पवारांचे काही आठवणी तसेच त्यांचे किस्से देखील अनेकांनी सांगितले.
शनिवारी झालेल्या ‘नेमकचि बोलणे’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमात देखील अनेक नेते व मान्यवरांनी शरद पवारांच्या जुन्या काही आठवणींना उजाळा दिला. यावेळ नेमकचि बोलणे या पुस्तकाचे लेखक पत्रकार सुधीर भोंगळे यांनी देखील पवारांचे अनेक भन्नाट किस्से सांगितले. राजकरणासोबतच शरद पवारांचे क्रीडा क्षेत्रात सुद्धा मोठे योगदान आहे. कुस्ती, कबड्डी, हॉकी या सगळ्याच खेळांसाठी पवारांनी मोठे योगदान दिले आहे. या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) माजी आयुक्त ललित मोदी यांनी पवारांबाबत एक खुलासा केला आहे.
आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी (Lalit Modi) म्हणाले, २००५-२००८ या काळात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शरद पवार नसते तर, आयपीएल ही टी-२० स्पर्धा साकार झाली नसती. अशा शब्दात मोदींनी खुलासा केला. सध्या ललित मोदी यांच्यावर आयपीएलमध्ये मनमानीपणे कारभार केल्याचा आरोप आहे. तसेच बीसीसीआयचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका आहे. सगळ्या आरोपांमध्ये ते दोषी आढळून आले आहेत. बीसीसीआयने (BCCI) ललित मोदींवर आजीवन बंदी घातली आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘शरद पवारांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं, भाजपने ते रोखलं’
- शिवसेनेच्या बॅनरबाजीवरून नितेश राणे आक्रमक;म्हणाले,’शिवसेना हा नाच्यांचा…’
- कोहली कर्णधारपदावरून हटताच अश्विनचे चांगले दिवस; रोहितने सांगितली मोठी गोष्ट
- जयंत पाटलांकडून शरद पवारांना वाढदिवसाच्या करेक्ट बाराच्या ठोक्याला शुभेच्छा
- शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मेगा जॉब फेयरचे आयोजन

