Share

पोलिओचा एकही रुग्ण राहणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल : अजित पवार

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : पोलिओच्या समूळ उच्चाटनासाठी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवत असताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात पाच वर्षाखालील बालकांना पवार यांच्या हस्ते पोलिओचा डोस देण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, देशातून पोलिओचे समूळ उच्चाटन करण्याची जबाबदारी सामूहिक असून निरोगी पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. पोलिओचा एकही रुग्ण राहणार नाही, यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे. भविष्यातही पोलिओचा रुग्ण आढळू नये, म्हणून लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे.

पुढे पवार म्हणले “या मोहिमेदरम्यान प्रवासात असणाऱ्या बालकांना बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, टोलनाका अशा गर्दीच्या ठिकाणीदेखील पोलिओची लस दिली जाणार असून एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी पालकांनी प्रशासनाला प्रतिसाद द्यावा. ही मोहीम आपल्या सर्वांची मोहीम असून ती राबविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल,अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, आरोग्यसेवा विभागाचे उपसंचालक संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!