🕒 1 min read
पुणे – देशभरात दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढ होत आहे. आज पुन्हा एकदा सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जारी करण्यात आले. राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 35 पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता इंधन दरवाढीपासून नागरीकांना दिलासा मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे.
कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत असून उत्पादन मात्र कमी आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या ओपेक देशांची बैठक पार पडली, त्यामध्ये दररोज केवळ 4 लाख बॅरल उत्पादन वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे असं सांगण्यात येत आहे. जेव्हा जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतात, त्यावेळी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ होते असंही सांगण्यात येत आहे .
दरम्यान, गेल्या 18 महिन्यांपासून राज्यातील खाजगी वाहतूक बसेस आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेले असून सातत्याने वाढणाऱ्या डिझेल दरामुळे वाहतूकदारांच्या कंबरडे मोडले आहे. या दिवाळीमध्ये नाईलाजास्तव बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना आर्थिक बोजा वाढणार आहे. तसेच दिवाळी सुट्टीमध्ये परगावातून किंवा परराज्यातून पुणे मुंबई कडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या अतिशय नगण्य असते त्याचाही फटका बसचे दर वाढण्यामध्ये करावा लागतो अशी माहिती महाराष्ट्र राज्य माल व प्रवासी वाहतूक संघटनेचे अध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी आठ तास अखंडीत वीज द्या, अन्यथा रास्तारोको आंदोलन करू’
- ‘मुंबई मनपाच्या पैशांचा शिवसेनेकडून पक्षनिधी म्हणून वापर’, बाळा नांदगावकर यांचे आयुक्तांना पत्र
- डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क करणार लाँच
- ‘तुमच्याकडे ना हिंदुत्व, ना धर्म! आहे ते फक्त हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेले मुख्यमंत्रिपद’
- भारताने सर्वांत कमी कालावधीत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला-पंकजा मुंडे


