🕒 1 min read
सोलापूर – माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या सांगोला येथील निवासस्थानी माजी मुख्यमंत्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांत्वन पर भेट त्यांच्या कुटुंबाची घेतली. यावेळी माजी आमदार शेकपाचे जेष्ठ नेते गणपतराव (आबा) देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन केले.
याप्रसंगी गणपतराव देशमुख यांचे विधिमंडळातील आवारात स्मारक व्हावे अशी मागणी फडणवीसांनी केली. यावेळी माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख, खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ.समाधान आवताडे, आ.रणजितसिह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, सभागृहनेते शिवानंद पाटील, नगरसेवक नागेश भोगडे, नगरसेवक संजय कोळी आदीजन उपस्थित होते.
एक तत्वनिष्ठ,सामान्य माणसाचा नेता आणि दुष्काळी भागासाठी कायम लढलेले नेते स्व. गणपतराव देशमुखजी यांच्या सांगोल्यातील निवासस्थानी आज भेट देऊन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.विधिमंडळातील आवारात त्यांचे उचित स्मारक व्हावे!https://t.co/by76MVc7W4 pic.twitter.com/ezoDcwe9mr
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 17, 2021
गणपतराव देशमुख यांचे नुकतेच सोलापूर येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ९४ वर्षांचे होते. गणपतराव देशमुख हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची पित्ताशयाची शस्त्रक्रिया देखील पार पडली होती.
आमदार गणपतराव देशमुख हे सलग 54 वर्षे सांगोला विधानसभेचे सदस्य होते. एकाच पक्षात राहून एकाच मतदार संघातून सलग 11 वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर नोंदला गेला आहे. याची गिनीज बुकात देखील नोंद करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबान्यांना धक्का ; उपराष्ट्रपति अमरुल्लाह सालेह यांनी स्वतःला कार्यकारी राष्ट्रपती म्हणून केलं घोषित
- ‘मी २०१३ सालीच म्हणालो होतो की भारताने तालिबानसोबत..’; ओवेसींनी दिलेला इशारा अखेर खरा ठरला
- योगी सरकारकडून पुन्हा एक नामकरण; आता ‘अलीगढ’ होणार ‘हरिगड’
- राज्यपालांच्या निर्णयाचा पाळणा नक्की कितव्या महिन्यात हलणार आहे? ‘सामनातून’ टीका
- ‘दोन डोस घेतलेल्यांना सुद्धा डेल्टा प्लसचा संसर्ग झाला ही बाब सत्य’; टास्क फोर्स प्रमुखांची कबुली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
