Share

खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे, राणेंचा घणाघात

Published On: 

मुंबई : विधानसभा 2019 नंतर राज्यात वेगळ्यापद्धतीचं राजकारण अनुभवायला मिळालं. महाराष्ट्रात पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या रुपात राज्यातील जनता सत्ताकारण अनुभवत आहे. मात्र अधूनमधून या सत्ताकारणात काहींना काही वादळं निर्माण होताना पाहायला मिळतात. शिवसेना संसदीय नेते आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनीच याबाबत ट्वीटरवरुन याची माहिती दिलीय. लवकरच ही रंगलेली रोखठोक मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

आतापर्यंत राऊत यांनी शिवसेना प्रमख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घेतलेल्या मुलाखती चांगल्याच गाजल्या आहेत. सामनामधून या मुलाखती आल्यानंतर अनेकदा देशभर वादळं निर्माण झाली होती. राऊतांच्या बेधडक प्रश्नांना बाळासाहेबांनी दिलेली बेधडक उत्तरं चांगलीच गाजली होती.

मराठा आरक्षण प्रकरणी १५ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालय देणार अंतरिम आदेश

आता सत्तास्थापनेनंतरची पहिली स्फोटक मुलाखत असेल. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेवेळी झालेल्या राजकीय घडामोडींचे खळबळ निर्माण करणारे गौप्यस्फोट या मुलाखतीतून होतील, असा दावा खुद्द संजय राऊत यांनी केला आहे. सामनामध्ये लवकरच या मॅरेथॉन मुलाखतीचे भाग प्रसिद्ध होणारेत. या मुलाखतीचे व्हिडीओही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.

देशाचे नेते मा.शरद पवार यांच्याशी आज दिलखुलास गप्पा झाल्या. ही जोरदार राजकीय मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल. लवकरच सामनात प्रसिद्ध होइल आणि वृत्त वाहिन्यांवर पहाता येईल. चीन पासून महाराष्ट्रातील घडामोडी पर्यंत जोरदार बोलले’. अस संजय राऊत यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.

दरम्यान, आता भाजपनेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याची चांगलीच खिल्ली उडवली आहे. खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे. देश कुठल्या संकटात आहे आणि ह्यांच्या मुलाखती चालू आहेत. इतिहासामध्ये जाऊन काही गोष्टी आत्ता कळल्या तरी त्याचा कोणाला काय उपयोग? लोकं चिडली आहेत, इंटरव्यू मध्ये इंटरेस्ट नाही कोणाला. खरं कौशल्य लढ्यामध्ये असतं बोलण्यामध्ये नाही असं राणे यांनी म्हटलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!