🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : देशात दुधाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभाव जाहीर करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधी नाही, अशी माहिती केंद्रीय दुग्धविकस राज्यमंत्री संजीवकुमार बलियान यांनी राज्यसभेत दिली. दुध हा नाशवंत पदार्थ असल्याने त्याला आधारभूत किंमत देता येणे शक्य नाही, असे त्यांनी सांगितले.
“दुधाच्या किंमती सरकार ठरवत नाही. दुधाचा उत्पादनखर्च लक्षात घेऊन सहकारी आणि खासगी डेअरी दुधाचे दर निश्चित करतात, “ असे श्री. बलियान म्हणाले. देशात दुधाचे उत्पादन दरवर्षी सातत्याने वाढत असून २०१७-१८ मध्ये देशात १७६.३५ दशलक्ष टन दुध उत्पादन झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.दुधाचे दर कोसळल्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी दुधासाठी आधारभूत किंमत असावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून लावून धरली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दुधाला हमीभाव देणार, अशी आश्वासने सत्ताधारी पक्षाचे नेत्यांकडून दिली जात होती. परंतु केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या उत्तरामुळे दुधाला हमीभाव देण्याची कल्पना प्रत्यक्षात येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

