मुंबई: राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. राज्यात मुंबई, पुणे हॉटस्पॉट ठरण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे प्रशासनाने, नागरिकांना काळजी करण्याचे आणि नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, राज्यातील रुग्णसंख्या वाढल्यानंतर आता शरद पवार मैदानात आले आहेत. आज बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि मुख्य आरोग्य सचिव प्रदीप व्यास शरद पवार यांना कोरोना स्थितीची माहिती देणार आहेत. दरम्यान त्यापूर्वी कॉंग्रेसचे मंत्री अमित देशमुख (Minister Amit Deshmukh) यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.
सध्या सिनेमा हॉल किंवा मॉल्स बंद करण्याची गरज आहे असे आम्हाला वाटत नाही. पण व्यापक जनहितासाठी काही करायचे असल्यास, राज्य मंत्रिमंडळ या गोष्टींवर चर्चा करेल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत अंतिम निर्णय घेतील. असे अमित देशमुख यांनी म्हटले आहे.
दरम्यान महाराष्ट्रात कोरोना झपाट्याने वाढत आहे. दररोज कोरोनाची नवीन प्रकरणे वाढत आहेत. महाराष्ट्र रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष गणेश साळुंखे म्हणाले की, गेल्या तीन दिवसांत जेजे हॉस्पिटलसह महाराष्ट्रातील एकूण ३०५ डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आढळून येत आहेत. तसेच गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे तब्बल २६,५३८ नवीन रुग्ण आढळले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
- भाजपचा ‘तो’ दावा ठरला फोल; प्रत्यक्षात स्थिती मात्र वेगळी
- मोदींच्या सुरक्षेतील त्रुटीचा मुद्दा हायकोर्टात; उद्या होणार सुनावणी
- कोरोना रुग्णसंख्या वाढल्यानंतर शरद पवार मैदानात, आज महत्वाची बैठक
- फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट मोठ्या प्रमाणात पसरणार- डॉ. अविनाश भोंडवे
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक; नवाब मलिकांची प्रतिक्रिया

