🕒 1 min read
मुंबई : आगामी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी सर्व संघानी कंबर कसली आहे. या स्पर्धेच्या उद्देशाने अनेक संघ टी-२० मालिका खेळण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे बीसीसीआय आयपीएल २०२१ चे उर्वरित सामने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आधी आयोजीत करण्याच्या तयारीत आहे.
यादरम्यान बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने याच दिशेने पाऊल उचलत मायदेशातील आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-२० मालिकेत बदल केला आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. यानंतर ते थेट बांग्लादेशच्या दौऱ्यावर येतील. या दौऱ्यात पुर्वनियोजीत कार्यक्रमानुसार ३ टी-२० सामने होणार होते. मात्र आता या सामन्याची संख्या ३ वरुन वाढवत ५ करण्यात आली आहे. त्यामुळे बांग्लादेशच्या संघाला आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमिवर अधिक टी-२० सामने खेळण्याची संधी मिळेल.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे. तसेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेही या दौऱ्यास सहमती दर्शवली आहे. यादरम्यान भारतात आयोजीत टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावर कोरोना परिस्थीतीमुळे टांगती तलवार आहे. जर कोरोना परिस्थीती सुधारली नाही तर ही स्पर्धा युएईमध्ये आयोजीत केली जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘इटर्नल्स’ हॉलिवूड चित्रपटात घडणार भारतीय संस्कृतीचं दर्शन
- गिरीश कुबेर यांच्या अडचणीत वाढ ; पुण्यामध्ये भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल
- ‘व्हॉट्सअॅप वापरणा-यांची प्रायव्हसी धोक्यात आणू देणार नाही; मोदी सरकारच्या अटी अमान्य’
- शरद पवार-मुख्यमंत्री ठाकरे भेट : पवारांना माझा सॅल्यूटच; एकनाथ शिंदेंनी केलं कौतुक !
- अर्धे कोविड केअर सेंटर बंद झाल्यानंतर विभागीय पथकाचा हा ‘विशेष’ अहवाल आला समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
