Share

…तर हक्काची काम हातातून जातील, रोहित पवारांचे मराठी तरुणांना आवाहन

Published On: 

पुणे : लॉकडाउनच्या काळात परप्रांतीय मजूर आपल्या गावी परतले होते. पण, आता अटी शिथिल झाल्यामुळे हे मजूर पुन्हा एकदा पुण्याकडे निघाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ‘आपल्या हक्काची कामं जाऊ शकतात, मराठी तरुणांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार कराव्या’ असं आवाहन केलं आहे.

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावे, कॉंग्रेस नेत्यांचा आग्रह

पुण्यासारख्या शहरात रोज १७ हजारांपेक्षाही अधिक स्थलांतरित मजूर परतत आहेत.त्यामुळं येत्या काही दिवसात आपली हक्काची कामं जाऊ शकतात. त्यामुळं मराठी युवांनी तातडीने कंपन्यांत जॉईन होण्याचा विचार करावा. अनेकांनी चांगला प्रतिसाद दिला,पण अजून देण्याची गरज आहे.कोणतंही काम लहान-मोठं नसतं. अस आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुण्यात 144 रेल्वेगाड्यातून 30 हजार मजूर पुण्यात परतले आहेत. 22 हजार थेट पुणे रेल्वे स्टेशनवर तर 8963 जण लोणी, दौंड, उरुळी कांचन अशा स्थानकांवर उतरले आहेत.

महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये थोरातांचचं वजन, प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चांना पूर्णविराम ?

लॉकडाउनच्या काळात 139 रेल्वे गाड्यातून 1 लाख 80 हजार मजूर मुळगावी गेले आहेत. पण, आता पुण्यात मोठ्या संख्येनं मजूर परत येत आहे. पुणे -पटणा, मुंबई- बंगलोर, भोपाळ-गोवा, मुंबई-भुवनेश्वर, मुंबई-हैदराबाद, मुंबई-गदग या गाड्या जेव्हा परत फिरतात तेव्हा या गाड्यातून साधारण 2000 प्रवासी रोज परत येत आहे, अशी माहिती माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!