Share

राहुल गांधींनी काँग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारावे, कॉंग्रेस नेत्यांचा आग्रह

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोनाने चांगलंच थैमान घातलेलं आहे. तसेच कोरोना नियंत्रणात ठेवण्यास केंद्र सरकार अपयशी ठरत आहे. त्यासोबतच नेपाळची वाढलेली मुजोरी आणि चीनसोबतचा सीमावाद या संकटांनांही मोदी सरकारला तोंड द्यावं लागत आहे. या संधीचा फायदा विरोधक कार्यशील अध्यक्षाशिवाय म्हणावा तसा घेऊ शकत नाहीयेत. यामुळेच सध्या स्थितीत काँग्रेस आक्रमक दिसत नाही.

फेसबुकने आणि ट्वीटरने नोकरी नाकारली…मग ‘या’ दोघांनी जे केलं ते खरोखरच अद्भुत आहे

दरम्यान, ही पक्षाची अवस्था पाहूनच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राहुल गांधीना काँग्रेसचे अध्यक्षपद ग्रहण करावी अशी मागणी केली आहे. आज काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची बैठक पार पडली. आज झालेल्या बैठकीत अशोक गेहलोत यांनी हा प्रस्ताव कमिटीसमोर मांडला. गेहलोत यांच्या मागणीला युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

आईने लोकांच्या घरी धुणी-भांडी करून शिकवलं, वसिमाने उपजिल्हाधिकारी होऊन पांग फेडले !

यापूर्वी राहुल गांधींची 2017 ला काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. 2019 मधील लोकसभेच्या निकालानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सोनिया गांधीनी पक्षाची धुरा सांभाळली आहे. काल झालेल्या बैठकीत कोरोनाच्या काळात तेलाचे वाढलेले दर आणि चीनसोबतचा वाढत्या सीमावादासंबंधी केंद्रसरकारविरोधात प्रस्ताव मंजूर केला. या बैठकीबद्दल अधिक माहिती देताना काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, या बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर केले. तसेच गेल्या सतरा दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतीबद्दल त्यांनी चिंताही व्यक्त केली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!