🕒 1 min read
नवी दिल्ली : नियंत्रण रेषेजवळ भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेली संघर्षाची स्थिती निवळण्याचे संकेत मिळत आहेत. काल चीनच्या हद्दीतील चुशुल-मोल्डो येथे दोन्ही देशांच्या वरिष्ठ सैन्य अधिकाऱ्यांमध्ये उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीत शांततेसाठी सैन्य मागे घेण्यावर सहमती झाल्याची बातमी हाती येत आहे.
फक्त 3 दिवसांत कोरोना रुग्ण बरा होणार, रामदेव बाबांनी जगासमोर ठेवले कोरोनावरील औषध
या चर्चेमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर दोन्ही देशाच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले. गलवान खोऱ्यातील संघर्ष तसेच अन्य वादांच्या मुद्दावर या बैठकीत चर्चा झाली. चांगल्या, सकारात्मक वातावरणात ही चर्चा झाली.
दरम्यान, लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे दोन दिवसाच्या लडाख दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस ते लडाखमध्ये असतील. या दौऱ्याच्यावेळी ते गलवान खोऱ्यामध्ये जाऊन तिथल्या कमांडर्सकडून परिस्थिती जाणून घेतील. सहा आठवडयांपासून पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ तणावाची स्थिती आहे.
नाशिकमधील ठक्कर डोम येथे ५०० बेडचे कोविड केअर सेंटर उभारले जाणार
भारत आणि चीन दोन्ही देशांचे सैनिक आमने-सामने उभे ठाकले आहेत. नियंत्रण रेषेजवळील फॉरवर्ड लोकेशन्सवर जाऊन तिथे तैनात असलेल्या सैनिकांबरोबर लष्करप्रमुख संवाद साधतील व त्यांच्याकडून परिस्थिती जाणून घेतील.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

