पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आमदारकीच्या वर्षपूर्तीनिमित्त कोथरूड भागातील आढावा घेऊन वर्षभरातील कार्याचं अहवाल प्रकाशन देखील केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.
कोल्हापूरमधील कोणत्याही विधानसभा मतदार संघातून आज एखाद्याने राजीनामा द्यावा आणि पोटनिवडणूक घ्यावी म्हणजे त्यांना समजेल, जर निवडून नाही आलो तर राजकारण सोडून देईन आणि हिमालयात जाईन, असं खुलं आव्हान देत चंद्रकांत पाटलांनी शड्डू ठोकला आहे.
मागील वर्षी विधानसभा निवडणूक जाहीर झाली तेव्हा मला अमित शाह यांनी सांगितले की, आपको विधानसभा निवडणूक लढनीं पडेगी. अमितभाई माझा अजून विधान परिषदेचा एक महिना शिल्लक आहे मला कुठे यात अडकून ठेवता?, असं कळवल्याचं देखील सांगितलं.
मात्र, ‘अमितभाईंनी आग्रह धरला तुम्हाला विधानसभा लढवायची असून आपको पुना मैं कोथरूडसे लढना है,’ असंही सांगितलं. त्यानंतर माझ्या नावाची कोथरूड मतदार संघातून घोषणा झाली आणि आजवर माझ्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. मला मिळालेल्या शिकवणीनुसार कोणी कितीही आरोप प्रत्यारोप केले तरी आपण आपले काम करीत रहायचे आणि तेच मी आजवर करीत आलो, असं देखील पाटील म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- कपिल देव यांच्या निधनाच्या अफवांवर माजी क्रिकेटपटू मदन लाल भडकले
- कोरोनाच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन आज होणार ऑनलाईन मेळावे
- देशातील कोणत्याही नागरिकाला सीएएचा धोका नाही- भागवत
- भारताला चीनपेक्षा आधिक शक्तीशाली व्हावंच लागेल – मोहन भागवत
- चंडीगडमध्ये होणार ‘जर्शी’चे पुढील चित्रिकरण


