🕒 1 min read
उत्तर प्रदेश : लखीमपूर हिंसाचार परकरणी दोन समन्स पाठविल्यानंतर अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आरोपी आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर झाला. यावेळी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने शेतकऱ्यांना थार गाडीने चिरडले तेव्हा कुठे होतास? असा प्रश्न विचारला. यावर आशिषने त्यावेळी आपण कुस्ती बघायला गेलो होतो असे उत्तर दिले.
कुस्तीचे ठिकाण घटना घडली त्या ठिकाणाहून ४-५ किलोमीटर आहे. परंतु आशिषचे मोबाईल लोकेशन घटनास्थळा जवळीलच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिषने एसआयटीच्या चौकशीत सहकार्य केले नाही. यानंतर त्याला अटक करण्यात आले आहे.
दरम्यान, हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाला अटक झाल्यानंतर विरोधी पक्षांनी मिश्रा यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात बोलतांना शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या की,’मुलाला अटक आणि तरीही वडील मंत्रिपदावर कायम कसे?’ तसेच माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह म्हणाले की, ‘आरोपी आशीष मिश्रा उर्फ मोनूला शिक्षा होण्यासाठी मिश्रा यांना मंत्रिपदावरुन हटवले पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘एनसीबीच्या कारवाईवर शंका घेणेही चुकीचे!’ मलिकांच्या आरोपावर फडणवीसांची प्रतिक्रिया
- ‘प्रियंका गांधींच्या रुपाने इंदिराजींचे अस्तित्त्व पुन्हा दिसले!’ संजय राऊतांकडून ‘रोखठोक’ कौतूक
- ‘माफिया राज’ला सत्तेतील लोकांचा पाठिंबा; पंकजा मुंडेंचे मंत्री धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
- मुलगा जेरबंद होताच केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्यावर राजीनाम्याचा दबाव
- लखीमपूर हिंसाचार प्रकरणी मंत्री पूत्र आशिष मिश्राला बेड्या

