Share

काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती दखल घेतली जाते,सातत्याने काम करत रहा- सव्वालाखे

Published On: 

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या नवनियुक्त अध्यक्ष संध्या सव्वालाखे यांचा पदग्रहण सोहळा प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे दिमाखात पार पडला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील कार्यक्रमाला प्रांताध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, मावळत्या महिला प्रदेश अध्यक्षा चारुलता टोकस, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुश्मिता देव, राज्यस्थानच्या मंत्री ममता भूपेश, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, बी. एम. संदीप, सोनल पटेल, आशिष दुआ, जेनेट डिसुजा, सुशीबेन शहा, मुंबई महिला काँग्रेस अध्यक्ष अजंता यादव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मा. आ. मोहन जोशी, रामकिशन ओझा, राजाराम देशमुख आदी पदाधिकारी तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना संध्या सव्वालाखे म्हणाल्या, काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या कार्यकर्त्याची योग्य ती दखल घेतली जाते. सातत्याने काम करत रहा काँग्रेसमध्ये न्याय मिळतो असा हा पक्ष आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम करणाऱ्या सामान्य गृहिणीला पक्षाने नेहमी जबाबदारी दिली त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाने माझ्यावर आताही जी जबाबदारी दिली आहे त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. राज्यात महिलांचे संघटन मजबूत करून दिल्लीपर्यंत राज्याचे नाव उज्ज्वल करेन असे त्या म्हणाल्या.

मावळत्या अध्यक्षा चारुलता टोकस यांच्या कार्याचा गौरव मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, भाई जगताप, माणिकराव ठाकरे, ममता भुपेश यांच्यासह सर्व वक्त्यांनी केला तसेच संध्याताई सव्वालाखे यांना शुभेच्छा दिल्या.केंद्र सरकारने लादलेल्या काळ्या कायद्याची वस्तुस्थिती दाखवणारे, ‘शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारे तीन काळे कायदे’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सुश्मिता देव आणि ममता भुपेश यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

कृषी कायद्यावरून भाजपा, पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मंत्री, नेते, पदाधिकारी हे जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. परंतु हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून मोजक्याच धनदांडग्या उद्योगपतींच्या हिताचे असून शेतकरी मात्र देशोधडीला लागणार आहे ही काळी बाजू मांडणारी माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!