Share

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नीने नोंदवली पोलिस तक्रार, धक्कादायक कारण आलं समोर

Published On: 

चेन्नई : प्रसिद्ध लोकांच्या संबंधित व्यक्तींना प्रसिद्धी सोबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. याच समस्यांचा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार व बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना यांना करावा लागला. आपल्या नावाने बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी डोना यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सौरव गांगुली याची पत्नी डोना यांनी आपल्या नावे बनावट फेसबुक पेज बनवल्या प्रकरणी अज्ञात इसमा विरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. डोना यांनी आपल्या तक्रारीत म्हटले, ‘माझ्या नावाचा वापर करून आणि सौरव यांच्यासोबतचे माझे छायाचित्र वापरुन कोणीतरी बनावट फेसबुक पेज तयार केले आहे. माझ्या एका विद्यार्थ्यीनीने मला याबाबत सांगितले. आम्हा दोघांचे छायाचित्र वापरले गेले याविषयी काही प्रश्न नाही. मात्र, काही वेळा लोक टिप्पण्या करणे सुरू करतात. यामुळे गैरसमज निर्माण होतात. मला आशा आहे की, पोलीस हे प्रकरण मिटवतील.’

या प्रकरणाविषयी पोलिसांनी प्रतिक्रिया देताना म्हटले, “फेसबुक पेज बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या आयपी ऍड्रेसची ओळख झाली आहे. लवकरात लवकर आम्ही त्या व्यक्तीवर कारवाई करू.”

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!