औरंगाबाद: कोरोनाची लस कधी येईल याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागून होते , ती लस अखेर आज सकाळी औरंगाबादेत दाखल झाली आहे. देशात १६ जानेवारीपासून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जगभरातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असणार आहे.
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या केंद्रातून मंगळवारपासून लसींचे कंटेनर देशाच्या विविध भागांत रवाना होण्यास सुरुवात झाली. बुधवारी पहाटे पुण्याहून लस घेऊन वाहन सकाळी ९ वाजेच्या सुमारास शहरात दाखल झाले. औरंगाबादेत लस दाखल झाल्यानंतर या लसी सिडकोतील आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रात ठेवण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत असलेल्या औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी लस दाखल झाल्या आहेत. तसेच लातूर आरोग्य उपसंचालक विभागासाठीही लस दाखल झाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मृत शेतकऱ्याच्या नावावर उचलले पीककर्ज
- धनंजय मुंडेंवर झालेल्या ‘त्या’ गंभीर आरोपांनंतर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया!
- महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी ‘या’ झुंजार महिला नेत्याची लागली वर्णी
- कोणत्याही समितीच्या समोर आमचे मुद्दे अजिबात मांडणार नाही : संयुक्त किसान मोर्चा
- ग्रामीण भागाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा : चंद्रकांत खैरे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

