Share

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यावर ‘या’ दिग्गज भाजपा नेत्याने केला मोठा खुलासा

Published On: 

अहमदनगर : भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार फुटीवरून चांगलंच राजकारण तापल्याचं गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. भाजपाने राष्ट्रवादीमधील आणखी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितले होते. यावर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी, आमचे आमदार जाणार नसून निवडणुकींपूर्वी भाजपामध्ये गेलेलेच आमदार पुन्हा येण्यास ईच्छुक असल्याचे विधान केले होते.

या विधानानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. तर, राष्ट्रवादी मधून भाजपामध्ये गेलेल्या व निवडणुक हरलेल्या आमदारांबाबत चर्चा रंगल्या होत्या. कोणताही भाजप आमदार शरद पवार यांच्या संपर्कात नाही. तसेच आमचे कुणीही आमदार कुठेही जाणार नाही पण आम्हीच त्यांचे आणतो आहोत, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला होता.

लवकर बरे व्हा, रोहित पवारांच्या निलेश राणेंना सदिच्छा

आता, माजी आमदार व भाजपा नेते वैभव पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घरवापसी करण्यावर एक सूचक प्रतिक्रिया दिली आहे. “काल परवा काही वृत्तवाहिन्यांनी ज्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला ते पुन्हा आधीच्या पक्षात परतणार असल्याच्या बातम्या दाखवल्या. यात माझाही फोटो दाखवून तसं सांगण्यात आलं. मात्र, मी अनेक वृत्तवाहिन्यांशी संपर्क करुन माझा खुलासा केला आहे. माझ्याशी अद्याप कुणाचा संपर्कही झालेला नाही. तसेच माझा सध्या घरवापसीचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही. मी आहे त्या घरात सध्या तरी खुश आहे.”, अशी प्रतिक्रिया वैभव पिचड यांनी दिली आहे.

‘डॉक्टरांची माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,बोलण्याच्या ओघात शाब्दिक कोटी झाली’

या प्रतिक्रियेनंतर आता अनेक अर्थ लावले जात आहेत. ‘सध्या’ या शब्दाचा वापर केल्यामुळे वैभव पिचड यांनी सावध भूमिका घेतल्याचे बोलले जात आहे. तर, वैभव पिचड यांनी त्यांचे वडील माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यासह विधानसभेपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे आता, नवाब मलिक यांनी केलेला दावा खरा कि खोटा अशी चर्चा रंगली असून येणाऱ्या काळातच ‘घरवापसी’ होणार कि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपामध्ये आमदार प्रवेश करणार असल्याचे विधान खरे ठरणार! हे स्पष्ट होईल.

शिववडापाव आणि थाळी नंतर आता शिव दवाखाने; भाजपा आमदाराची उपरोधिक टीका

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!