🕒 1 min read
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या डॉक्टरांसह देशातील डॉक्टरांबद्दल केलेल्या विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीकेची झोड उठत आहे. संजय राऊत यांनी, ‘WHO ला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. WHO म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नही. कंपाऊंडरकडून घेतो. कारण त्यांना जास्त कळतं.’ असे विधान केलं होतं.
यावर आता कंदिवली पूर्वचे भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी देखील ट्विट केले आहे. “शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशानंतर आता येत आहेत शिव दवाखाने…इथे डॉक्टरांच्या ऐवजी कंपाऊंडर असतील.” अशी उपरोधिक टीका आमदार भातखळकर यांनी केली आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण कोरोना योद्धांचा अपमान झाला असून त्यांच्या विधानावर भाजपा वैद्यकीय आघाडी महाराष्ट्र प्रदेशने देखील तीव्र आक्षेप घेतला आहे.
शरद पवार यांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या 1 हजार बेडचे कोव्हिड सेंटरचे टोपेंनी केले उद्घाटन
शिव वडापाव आणि थाळीच्या घवघवीत यशा नंतर आता येत आहेत शिव दवाखाने…
इथे डॉक्टरांच्या ऐवजी
कंपाऊंडर असतील.— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) August 17, 2020
तसेच, “कोरोनामुळे लोक किड्या मुंग्या सारखे मरत असून देशात महाराष्ट्राचा कोरोना मृत्युदर सर्वाधिक आहे.कोरोना बाधितांवर उपचार करताना दोनशे ते तीनशे डॉक्टर मृत्युमुखी पडले आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात राजकीय मनोरंजनासाठी डॉक्टरांचा तमाशा करू नका अशी विनंती करत, त्यांनी केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त करण्यापेक्षा डॉक्टरांकडे उपचारासाठी जाणार नाही, असे श्री राऊत यांनी जाहीर करण्याचे”, आवाहन प्रसिद्ध डॉक्टर तथा लेखक अमोल अन्नदाते यांनी एका व्हिडीओद्वारे केले आहे.
निशिकांत कामत व्हेंटिलेटरवरच, मृत्यूची बातमी खोटी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

