औरंंगाबाद : शहरातील विविध भागातून चोरांनी चार दुचाकी लांबविल्या. या घटना आठवडाभरात घडल्या. अब्दुल खालीक शेख महेबुब (वय ४१, रा. सिल्कमिल कॉलनी) यांनी २८ जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास घरासमोर दुचाकी उभी केली होती. त्यानंतर २६ जून ते ७ जुलै या काळात त्यांची दुचाकी (एमएच-२०-बीऐड-८००७) चोराने हँडल लॉक तोडून लांबवली.
तर दीपक मारोती चिंचोलकर (वय २९, रा. घृष्णेश्वर कॉलनी, जाधववाडी) यांनी ५ जुलै रोजी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास चिकलठाणा एमआयडीसीतील नेट व्हॅल्यू फायनान्स सर्व्हिसेस समोर दुचाकी (एमएच-२०-डीझेड-०५१८) उभी केली होती. चोराने अवघ्या दीड तासात त्यांची दुचाकी लांबवली.
तसेच भाऊसाहेब मारुती अभंग (वय ५२, रा. अजिंक्यतारा सोसायटी, वाळुज) यांनी २ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-बीएच-५६१०) उभी केली होती. चोराने त्यांची दुचाकी मध्यरात्री हँडल लॉक तोडून लांबवली. याशिवाय सुलेमान सय्यद सय्यद मुर्तुजा (वय ५९, रा. किराडपुरा) यांनी २ जुलै रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घरासमोर दुचाकी (एमएच-२०-बीटी-१९८३) उभी केली होती. चोराने त्यांची देखील दुचाकी लंपास केली. याप्रकरणी संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

