भिवंडी – भिवंडीत वाहतूक पोलिसांनीच रस्त्यावर पडलेले खड्डे भरले आहेत. गणेशोत्सवात सामाजिक बांधिलकीतून त्यांनी हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. दुसरीकडे रस्त्यावरचे खड्डे बुजविण्याची मागणी करून कृतीहीन आंदोलन करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे.
भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मायने यांच्या म्हणण्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ते विकास महामंडळ एमएमआरडीए तसेच रस्त्या संदर्भात असलेल्या विभागांना पत्रव्यवहार करून गणपतीपूर्वी खड्डे बुजवण्याचे लेखी पत्र दिले होते. मात्र, त्यावर सर्वच शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष केल्याने आज रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून वाहतूक पोलिसांनी भिवंडीत विविध मार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले आहे.
विशेष म्हणजे पोलीस अधिकारी मायने यांनी असेही सांगितले आहे की मुंबई नाशिक महामार्ग तसेच ठाणे ते भिवंडी, कशेळी ते अंजुर फाटा व मानकोली ते चिंचोटी-कामन रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. शिवाय वाहनांचे अपघात आणि नुकसान देखील या ठिकाणी होतात आणि त्याला सर्वस्वी जबाबदार नागरिक वाहतूक पोलिसांना जवाबदार ठरवतात. त्यामुळे प्रशासनाला वारंवार विनंती करूनही रस्त्यांवरील खड्डे बुजवत नसल्याने आज वाहतूक पोलिसांना रस्त्यावर उतरून खड्डे बुजवण्याची वेळ आली आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘हे’ सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय? शिवसेनेचा भाजपला सवाल
- ‘भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटते’; अफेरच्या चर्चांवरून भडकली मुनमुन दत्ता
- ‘राज्यघटनेशी बांधिल असलेल्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे’
- मोठी बातमी : विराट कोहली कर्णधारपद सोडण्याच्या तयारीत
- स्विस बँक केंद्र सरकारला देणार भारतातील काळा पैसा खातेधारकांची तिसरी यादी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

