मुंबई: साकीनाका बलात्कारप्रकरणी राज्यभर संताप व्यक्त केला गेला. राज्यात कायद्याचा, पोलिसांचा धाक राहिला की नाही, असे सवाल भाजपने ठाकरे सरकारला केले. तर सरकार अशा घटनेबाबत संवेदनशील नाही, असा आरोपही करण्यात आला. दरम्यान यावरच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’ च्या अग्रलेखातून भाजपला सवाल केला आहे.
साकीनाक्यासारखी प्रकरणे ही एका भयानक विकृतीतून घडत असतात व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ही विकृती उफाळून येऊ शकते. हाथरस बलात्कार व हत्या प्रकरणाची तुलना साकीनाका घटनेशी केली जात आहे. ती सर्वस्वी चुकीची आहे. उलट साकीनाका प्रकरणात १० पोलिसांनी १० मिनिटांत आरोपीस गजाआड करून कायद्याचा धाक काय असतो ते दाखवून दिले. मुळात हे जे विकृत नराधम असतात त्यांना कायदा वगैरे काही कळत नाही. त्यामुळे ही विकृती दिसेल तेथे ठेचून काढणे हाच उपाय योग्य ठरतो. साकीनाक्यातील पीडित महिलेस दोन मुली आहेत. त्या निराधार झाल्या आहेत. त्या मुलींच्या शिक्षणाची व पुढची जबाबदारी राज्य सरकार घेत असल्याची घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली हे सरकारच्या संवेदनशीलतेचे लक्षण नाही काय? असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे.
गुन्हा घडणाऱ्या प्रत्येक ठिकाणी पोलिसांना हजर राहणे शक्य नसते, असे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितले. त्यावरून काही लोकांनी वाद केला आहे. खासकरून राष्ट्रीय महिला आयोगाने पोलीस आयुक्तांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. मुंबईच्या पोलिसांनी चुकीचे असे काय सांगितले? लखनौ, पाटणा, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू पोलीस आयुक्तांचेही हेमंत नगराळे यांच्याप्रमाणेच मत असेल व ते बरोबर आहे. मुंबई पोलीस सावध व सक्षम आहेत आणि संपूर्ण समाजाचे गुन्हेगारीकरण झालेले नाही. पोलीस व समाजाचा एकमेकांवर विश्वास आहे. तो आहे तोपर्यंत कायद्याचे राज्य राहील. मुंबईसह महाराष्ट्रात असे कायद्याचेच राज्य आहे. विरोधकांनी साकीनाका बलात्कारप्रकरणी कितीही धुरळा उडवला तरी कायद्याच्या राज्यास तडा जाणार नाही. असा इशाराही संजय राऊत यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- ‘मुंबई महिलांसाठी जगातील अत्यंत सुरक्षित शहर’ सामनातून पलटवार
- ‘भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटते’; अफेरच्या चर्चांवरून भडकली मुनमुन दत्ता
- ‘राज्यघटनेशी बांधिल असलेल्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे’
- ‘ओबीसींना दिवसाढवळ्या डावललं जातंय’,पडळकरांचा आरोप
- ‘ओबीसी आरक्षण प्रश्नी आज मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

