🕒 1 min read
मुंबई : रंगशारदा या नावातच रंग आणि शारदा आहे. रंग मंचाचे नाव आहे. नाटककार विद्याधर गोखले अशा रंगमंचावरुन आज पुन्हा तिसरी घंटा वाजवताना मला गहिवरुन आलं अशा शब्दात मराठीबाणाकार अशोक हांडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांच्या पुढाकाराने आज रंगशारदा नाट्यगृहाचा पडदा समारंभपुर्वक उघडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेते प्रशांत दामले, कविता लाड, मधुरा वेलणकर, जयवंत वाडकर, संगीतकार मिलिंद जोशी आदी उपस्थितीत होते.
लॉकडाऊन नंतर काल मराठी नाटक पहायला आलेल्या नाट्य रसिकांचे आमदार आशिष शेलार यांनी रंगशारदाच्या प्रवेशद्वारावर फुल देऊन स्वागत केले. काल पासून नाटकाला परवानगी दिल्याच्या निमित्ताने हा विशेष खेळ आयोजित करण्यात आला होता. यावेळी रंगभूमीवरील तंत्रज्ञ व पडद्यामागच्या कलावंताना कोरोना काळात मदत करणाऱ्या अशोक हांडे, प्रशांत दामले, बाबू राणे, प्रिती जामकर, रत्नाकर जगताप, हरी पाटणकर यांचा शेलार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार आशिष शेलार म्हणाले की, रंगभूमीचा पडदा महायुद्धात, आणिबाणीत ही पडला नव्हता पण या नैसर्गिक संकटात तो पडला. त्यानंतर इतर घटकांचा महाराष्ट्र शासनाने जसा विचार करून सवलत दिली तशी सवलत मराठी रंगभूमीला देण्यास विलंब झाला. मराठी रसिक आणि कलावंत यांची झालेली ताटातूट लवकर संपावी व पुन्हा भेट व्हावी म्हणून शासनाने प्रयत्न केले नाही. मद्य आणि मद्यप्रेमी यांची ताटातूट फारकाळ सरकारने होऊ दिली नाही तसा विचार नाट्यरसिकांचा संवेदनशील पणे सरकारने केला नाही, असा टोला यावेळी आशिष शेलार यांनी लगावला. यावेळी प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात यावेळी प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग रंगला.
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री सावरकरवादीच, कोणी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला तर…- संजय राऊत
- २०२० मध्ये पाठवली नोटिस; अन २०२१ मध्ये पाडले दिवाण देवडीतील ते ‘अनधिकृत’ बांधकाम!
- सोशल मीडियावरील काँग्रेसचे समर्थक दहा पट वाढवायचे आहे-मुत्तेमवार
- ‘गांजा नसानसात भीनल्याने, समीर वानखेडेंच्या पत्नीवर अभद्र भाषेत टिका सुरु आहे’; चित्रा वाघ यांचा घणाघात
- पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी 3 खेळाडूंनी वाढवला विराटचा त्रास!


