औरंंगाबाद : प्रवाशाला मारहाण करित दोन मोबाइल, ५२ हजारांची रोख रक्कम असा सुमारे एक लाख ४२ हजारांचा ऐवज लांबविल्या प्रकरणी अटकेत असलेल्या शेख इम्रान शेख निसार (वय ३८, रा. रामराई रोड, पत्रा कॉलनी, वाळूज) याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वाय.जी. दुबे यांनी शनिवारी (दि.२६) दिले.
समाधान विश्वनाथ तायडे (वय ४०, रा. ऑडीटर सोसायटी, मयुर पार्क, हर्सुल) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे टॅ्रक्टरची एजन्सी आहे. १९ जून रोजी तायडे हे अहमनगर येथून मित्र अदिनाथ तायडे यांच्यासोबत कारने पहाटे तीन वाजेच्या सुमारास ओएसीस चौक (वाळूज) येथे आले.
त्यानंतर समाधान तायडे हे घरी जाण्यासाठी चौकातील शेख इम्रान याच्या रिक्षात बसले. शेख इम्रान याने छावणी परिसरातील रेल्वे पुलाजवळील मंदीराजवळ रिक्षा उभी केली, व तायडे यांना मारहाण करुन त्यांच्याकडील दोन मोबाइल आणि खिशातील ५२ हजार रुपये हिसकावून घेत रिक्षातून धूम ठोकली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ….तर पुजाराला संघाबाहेर करावे, गावसकरांनी मांडले मत
- ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताची धावपटु हिमा दास दुखापतग्रस्त
- डब्ल्युटीसी गमावल्यानंतरही अमरनाथ यांच्याकडून विराटचे कौतुक
- ‘आठवणीतले दिवस’, फलंदाजीचा सराव करत असताना चाहरला आठवले शाळेतले दिवस!
- ‘फायनल हा एकच सामना असतो’ ; बेस्ट ऑफ थ्रीवरून कोहलीला सुनावले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

