🕒 1 min read
मुंबई : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज ट्वीटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलेली आहे. नामदेव महाराज यांचे नाव महापुरुषांच्या यादीतून वगळल्यामुळे संतप्त झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट केले आहे. ते म्हणाले कि, ‘ठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा विषय लावून धरू, असे यावेळी सर्वांना मी आश्वास्त केले,’ असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
ठाकरे सरकारने थोर महापुरुष संतांच्या यादीतून संत शिरोमणी नामदेव महाराज यांचे नाव वगळले आहे. यासंदर्भात आज श्री संत शिरोमणी नामदेव महाराज प्रतिष्ठान कर्वेनगरच्या शिष्टमंडळाने मला निवेदन दिले. आगामी विधीमंडळाच्या अधिवेशनात हा विषय लावून धरू, असे यावेळी सर्वांना मी आश्वास्त केले. pic.twitter.com/c5FXl0EKy2
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) February 23, 2021
राज्य सरकारकडून दरवर्षी राष्ट्रपुरुष, थोर व्यक्तींच्या जयंती आणि पुण्यतिथीला अभिवादन करण्यासाठीची यादी जाहीर केली जाते. यंदाही राज्य सरकारने थोर व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे यंदाच्या थोर व्यक्तींच्या यादीत बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर आणि डॉ. भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, १६ फेब्रुवारीला आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर, १७ सप्टेंबरला केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे आणि २७ डिसेंबरला डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्री असलेल्या सामान्य प्रशासन खात्याने याबाबतचा निर्णय घेतला आहे. मात्र, यंदाच्या यांदीत संत शिरोमणी नामदेव महाराज यांचं नाव नसल्याने नामदेव महाराजांच्या अनुयायांनी नाराजी वर्तवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- अहवाल येईपर्यंत हातावर बसणार होम क्वॉरंटाइनचा शिक्का
- मुख्यमंत्री ठाकरेंनी बोलावली महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता
- मुंबई इंडियन्सने अर्जुनची निवड केल्यानंतर घराणेशाहीची टीका, सचिन तेंडुलकरने केलं भाष्य
- लग्न समारंभासाठी औरंगाबाद महापालिकेचे नवे फर्मान
- ‘हे प्रकरण कधीही राठोडांच्या मानगुटीवर बसू शकतं, दोन-चार वर्षांनी कारवाई होणारच ना’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
