Share

‘हे प्रकरण कधीही राठोडांच्या मानगुटीवर बसू शकतं, दोन-चार वर्षांनी कारवाई होणारच ना’

Published On: 

मुंबई : ‘मी ओबीसीचे नेतृत्व करणारा सामान्य कार्यकर्ता आहे. माझ आयुष्य उध्वस्त करण्याचा हा प्रयत्न आहे’, असा आरोप संजय राठोड यांनी केला आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यानंतर वनमंत्री संजय राठोड जनतेसमोर कधी येतात याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. मात्र, आज प्रतीक्षा संपली आहे. दोन आठवड्यांहून अधिक काळानंतर संजय राठोड हे माध्यमांसमोर आले असून यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप धुडकावले आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले आहे. तसेच दोन-चार वर्षांनी संजय राठोड यांच्यावर कारवाई होणारच’, असे संकेतही दिलेत.

‘राठोड यांना कितीही क्लीन चिट दिली. आज त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर दोन-चार वर्षांनी त्यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात कारवाई होणारच ना. त्यामुळे पूजा चव्हाण प्रकरण कधीही राठोड यांच्या मानगुटीवर बसू शकतं’, असे स्पष्ट संकेतच मुनगंटीवार यांनी दिले आहेत. मुनगंटीवार यांच्या  अशा विधानामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!