टीम महाराष्ट्र देशा : दिल्लीच्या शाहीन बाग आंदोलनाला ज्या दहशतवादी संघटनेने फंडिंग ; त्याच संघटनेनचे मुंबईतल्या आंदोलनालाही फंडिंग असे म्हणत,सीएए, एनआरसी आणि एनपीआर संदर्भात राज्य सरकारची भूमिका अद्यापही स्पष्ट नाही. विघातक प्रवृत्ती रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत.भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी प्रचंड मोठा गौप्यस्पोट केला आहे.
पॉप्युलर फ्रंट इंडिया या दहशतावादी संघटनेने काँग्रेस नेत्याच्या खात्यावर जमा केला आहे असाही आरोप दरेकर यांनी केला.राज्यात सीएए आणि एनपीआर या विषयांवरून काही विघातक प्रवृत्ती रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आहे. शाहीनबागसारखे आंदोलन मुंबईत करण्याचा या विघातक प्रवृत्तींचा डाव आहे असाही आरोप प्रवीण दरेकर यांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे एकाबाजूला सी.ए.ए. च समर्थन करीत आहेत, पण या विषयासंदर्भात राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भूमिका मात्र गुलदस्त्यात आहे, त्यामुळे आता राज्यातील कोटयवधी जनतेला या विषयावरुन सरकारची भूमिका स्पष्ट झाली पाहिजे अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.
दरेकर पुढे म्हणाले की, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या अतिशय जहाल दहशतवादी मुस्लिम संघटनेने दिल्ली येथील शाहीनबाग आंदोलनाला फंडींग केले. फेसबुक पेजवर या संघटनेचे अस्तित्त्व आहे. ही संघटना स्वत:ला मुस्लिमांचे न्याय हक्क स्वातंत्र्य व संरक्षणाकरिता स्थापन झाल्याचा दावा करीत आहे, मात्र ही एक दहशतवादी संघटना आहे.
शाहीनबाग आंदोलनाला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने निधी पुरविल्याची माहिती ईडीला मिळाली आहे, त्याचप्रमाणे १.४ कोटी रुपये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित विविध खात्यात जमा करण्यात आले आहेत. याचा उल्लेख एन.आय.ए. या केंद्रीय तपास यंत्रणेने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये नमुद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे जे नेते आणि संस्था यांच्या नावावर कोटयवधी रुपये जमा करण्यात आले आहेत. हा पैसा रोख स्वरुपात तसेच आरटीजीएस, एनईएफटी मार्फत जमा करण्यात आल्याचा आरोप सुद्धा दरेकर यांनी केला आहे.
हेही पहा :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
