Share

..त्यांना देव व मंदिर हाच पर्याय उपलब्ध आहे : अवधूत वाघ यांचा महाविकास आघाडीवर निशाणा

Published On: 

मुंबई : कोरोना रोगाच्या थैमानामुळे देशात टाळेबंदी घोषित करण्यात आली होती. यानंतर जून महिन्यात टाळेबंदीमध्ये काहीशी शिथिलता आणली गेली व त्यानंतर अनुक्रमे जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीला जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी आणखी शिथिलता आणली गेली. महाराष्ट्र राज्यात आता आंतरजिल्हाबंदी उठवण्यात आली असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था देखील सुरु करण्यात आली आहे.

मात्र, कोरोना संसर्गाचा अजूनही असलेला धोका लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रार्थनास्थळांवरील बंदी कायम ठेवली आहे. भाजप आध्यात्मिक सेलच्या माध्यमातून राज्यभरातील मंदिर प्रमुखांची मंगळवारी बैठक झाली. केंद्र सरकारने काही अटी शर्थीवर मंदिरे सुरू करण्याची परवानगी दिलेली असताना राज्यसरकार मात्र परवानगी देत नसल्याच्या विरोधात आज जन आंदोलन करण्यात येत आहे.

सर्वोच्च न्यायालय प्रशांत भूषण यांच्या ‘त्या’ याचिकेत एवढे गुंतून पडले कि..सामनाने केले न्यायमूर्तींनाच लक्ष्य

भाजपाचे पदाधिकारी अवधूत वाघ यांनी समस्यांनी ग्रासलेल्या सामान्य माणसाला सरकारचा आधार नसल्याने मंदिर व प्रार्थनास्थळे खुली करण्याची मागणी केली आहे. “गेल्या ५ महिन्यांपासुन टाळेबंदी/रोजगार/आर्थिक अडचण/आरोग्य/शिक्षण आदी समस्यांनी ग्रासलेल्या, मानसिक तणावाखाली असलेल्या सामान्य माणसाला राज्य सरकारचा काहीच आधार नाही. अशावेळी श्रध्देच्या बळावर मानसिक तणावावर मात करू पहाणाऱ्यांना देव व मंदिर हाच पर्याय उपलब्ध आहे, ” असा टोला त्यांनी ट्विट द्वारे लगावला आहे.

आणखी एका नेत्याने राहुल गांधींना नेतृत्व देण्याबाबत केली ‘ही’ मोठी मागणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!