Share

सामन्यांच्या चारचाकीचे स्वप्न साकार करणारी टाटा नॅनो येतेय नव्या रुपात

Published On: 

नवी दिल्लीः चारचाकी वाहन खरेदी करायचे म्हणजे तुमचे एक उच्च आणि विशिष्ट उत्पन्न असावे लागते मात्र चारचाकीचे घेण्याचे स्वप्न सामाण्यंचे देखील असते. हेच स्वप्न कमी किमतीत पूर्ण केले होते ते देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या टाटा नॅनो या कार ने टाटाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची ड्रीम प्रोजेक्ट समजली जाणारी टाटा नॅनो बाजारातून आउट झाली आहे. परंतु, आता ही छोटी कार इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला येत आहे. टाटा नॅनोची इलेक्ट्रिक व्हर्जन समजली जाणारी जायेम नियो च टेस्टिंग नुकताच पार पडल्याच समजल आहे.

तीन वर्षापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये टाटा मोटर्सने जायेम ऑटोमोटिव्ह सोबत पार्टनरशीप केली होती. त्यावेळी टाटा नॅनोच्या इलेक्ट्रिक व्हर्जनला लाँच करण्याची घोषणा करण्यात आली होती. या कारला जायेम ऑटोमोटिव्ह ब्रँड अंतर्गत बाजारात उतवरले जाण्याची योजना बनवली होती. मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या कारला ओला इलेक्ट्रिकच्या फ्लिटमध्ये उतरवले जाण्याची योजना होती. परंतु, अनेक वर्षापासून या कारच्या प्रोडक्शन आणि तयारी संबंधी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. आता रशलेन मध्ये छापून आलेल्या एका रिपोर्टमध्ये या इलेक्ट्रिक कारला टेस्टिंग दरम्यान पुण्यात स्पॉट करण्यात आले आहे.

ओला इलेक्ट्रिकने जेम नियो इलेक्ट्रिक कारला सिटी मॅक्सच्या रुपात खरेदीसाठी टाटा मोटर्स फायनान्सकडून ४० कोटी रुपयांचा डेट फंड मिळवला होता. आता या घोषणेच्या ३ वर्षानंतर टाटा नॅनो इलेक्ट्रिक, फ्लिट ऑपरेटर्स किंवा खासगी म्हणून लाँच करण्यात आली नाही. नवीन रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, टाटा नॅनो इलेक्ट्रिक मध्ये 17.7 kW च्या क्षमतेचे ४८ वोल्टचे इलेक्ट्रिक मोटरचा प्रयोग करण्यात आला आहे. या मोटरला इलेक्ट्रा ईव्ही द्वारा सप्लाय करण्यात आला आहे. याला कंपनी टिएगो आणि टिगोर साठी इलेक्ट्रिक सप्लाय केला होता.

या कारला टाटा नॅनोच्या नावाने बाजारात उतरवले जाते की, जायेम नियो या नावाने बाजारात उतरवले जाते हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. टेस्टिंग मॉडलवर कुठेही नॅनोचा बॅच पाहायला मिळाला नाही. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, या कारमध्ये एंटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, फ्रंट सीटसाठी बेल्ट रिमाइंडर, रिवर्स पार्किंग सेंसरचा समावेश केला जाणार आहे. या कारची टॉप स्पीड ८५ किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे. या कारला सिंगर चार्जमध्ये २०३ किलोमीटर पर्यंत रेंज मिळू शकते. दरम्यान, कंपनीकडून या कारसंबंधी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!