🕒 1 min read
नवी दिल्ली : स्टरलिंग बायोटेक/ संदेसरा घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या दिल्लीतील घरावर ईडीची छापेमारी सुरु असून ईडी पटेल यांची चौकशी करत आहे. पटेल यांचा जबाब देखील नोंद केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मोठी बातमी : मी पडळकरांना फार महत्व देत नाही – शरद पवार
अहमद पटेल हे सोनिया गांधी यांचे विश्वासू आणि राजकीय सल्लागार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे नाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आले आहे. याप्रकरणाची चौकशी त्यांच्याकडे करण्यात येत आहे.
Sandesara brothers scam much bigger than PNB scam, claims ED
Read @ANI story | https://t.co/xWC9LQ92Rk pic.twitter.com/QHbcM9qCEq
— ANI Digital (@ani_digital) June 29, 2019
संदेसरा ब्रदर्सचे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण समोर आले होते. यामध्ये जवळपास पाच हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले. त्यानुसार आता त्यासंबधी अहमद पटेल यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे एक पथक त्यांच्या घरी गेले आहे.
ईडीचे म्हणणे आहे की संदेसरा भावांचा घोटाळा हा नीरव मोदींच्या घोटाळ्यापेक्षा मोठा आहे. २०१७मध्ये सीबीआयने ५,८३८ कोटी रूपयांच्या घोटाळ्यामध्ये एफआयआर दाखल केला होता. २०१९मध्ये संसेदरा प्रतिष्ठानांमध्ये छापा टाकण्यात आला होता. यात ९ हजार कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आली होती.
‘या’ राज्यातील सरकारने 31 जुलैपर्यंत वाढवला ‘लॉकडाउन’
जेव्हा तपासाची दिशा पुढे सरकरील तेव्हा आश्चर्यजनक माहिती समोर आली. यात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याचाही समावेश असल्याचे समोर आले. संसेदरा भावांनी भारतीय बँकांसह विदेश बँकांकडूनहू कर्ज घेतले होते. संसेदरा भावांनी आंध्रा बँक, युको बँक,एसबीआय, अलाहाबाद बँक आणि बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतले होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
