मुंबई : गेले दोन दिवस कॉंग्रेसच्या नाराजीच्या बातम्या माध्यमांमधून येत आहेत.या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीकडून सारवासारव करण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना विश्वासात घेऊनच महाविकास आघाडी सरकारचं काम सुरु आहे, असं स्पष्टीकरण राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे.
आज पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्रितपणे काम करत आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना विश्वासात घेऊनच काम होत आहे.
टोपे म्हणाले, काँग्रेसकडे दुर्लक्ष नाही. आघाडी सरकारची एक छोटी कोअर कमिटी आहे. या कमिटीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे प्रत्येकी दोन ज्येष्ठ नेते आहेत. या सर्व नेत्यांच्या कोअर कमिटीची बैठक होते. ही कोअर कमिटी एखाद्या महत्त्वाच्या मुद्द्यावर निर्णय घेते.
दरम्यान, नुकतंच महाविकास आघाडी सरकारमध्ये सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेतलं जात नसल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वाची बैठक देखील झाली. या बैठकीत सरकारमध्ये काय भूमिका घ्यायची याबाबत चर्चा झालीय. काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही महत्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सह अशोक चव्हाण आणि अन्य मंत्री उपस्थित होते.
“राज्याचे काही प्रश्न घेऊन आम्ही एकत्र बसलो होतो. चक्रीवादळ झालं, त्या पाहणीसाठी मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार गेले होते. सरकार म्हणून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा आमचे काही प्रश्न आहेत. आम्ही ते मांडणार आहोत. आम्ही तीन पक्ष आहोत. आमच्या काही मागण्या आहेत. साहजिकच काही प्रश्न आहेत. निर्णय प्रक्रियेमध्ये आम्हाला सामील करणयाचा प्रश्न आहे, त्याबद्दल आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मांडणार आहोत” महाविकास आघाडीचेही काही प्रश्न आहेत, त्यावर चर्चा झाली. त्याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करु, असं थोरात यांनी सांगितलं.
आरोग्यमंत्र्यांचा रुग्णालयांना इशारा; रुग्णालयांनी रुग्णांकडून भरमसाठी फी आकारली तर…
‘मुख्यमंत्री भाजपला विश्वासात घेतात, पण त्यांना फक्त राज्यपाल दिसतात’
जनाची नाही, मनाची असेल तर सत्तेबाहेर पडा; विखे पाटलांचा कॉंग्रेसला सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

