मुंबई : महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिक म्हणजेच ६५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांची वर्षभरातून किमान एकदा आरोग्य तपासणी करण्याचा मानस राज्य सरकारचा आहे. त्याकरिता जेष्ठांना शरद शतम आरोग्य कवच विमा योजनेला कार्यान्वित करण्यात येत आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विविध वैद्यकीय चाचण्यांबाबत शिफारशी करणे. या योजनेअंतर्गत आशा वर्कर व अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करणेबाबतच्या कार्यपध्दतीबाबत शिफारस करणे. योजनेतील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात आल्यानंतर त्याबाबतचा अहवाल संबंधीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्त होण्याबाबत व त्यात आजार आढळल्यास त्याचे निदान करणेबाबत, तसेच आरोग्य विभागाच्या व इतर योजनेमध्ये अभिसरण करण्याची कार्यपध्दतीबाबत शिफारस करणे इत्यादी बाबींसह शरद शतम योजनेच्या एकूण कार्यपद्धतीला निश्चित करण्यासाठी शिफारशी करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी या समितीवर नेमण्यात आली आहे. या समितीने ठराविक वेळेत याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश धनंजय मुंडे यांनी दिलेत.
राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांची या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल, एनयुएचएमचे अतिरिक्त संचालक डॉ. सतीश पवार, डीएमईआरचे उपसंचालक डॉ. अजय चांदनवाले, जे जे रुग्णालयातील डॉ. विनायक सावर्डेकर, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, ग्रामविकास विभागातील आस्थापना उपसचिव, तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे आस्थापना उपसचिव हे या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अनंत गितेंचं विधान पक्षशिस्तीत बसणारं नाही; पवारांवरील टीकेमुळे संजय राऊत व्यथित ?
- मराठवाडा चिंब; पुन्हा सर्वदूर पडलेल्या पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब
- स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या माधवराव देवसरकरांविरोधात पदाधिकऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप
- पन्नास लाखांसाठी तुम्हाला एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार – चंद्रकांत पाटील
- ‘महाराष्ट्राची परंपरा आठवत असेल तर सातव यांच्या पत्नीला तिकीट का दिले नाही?’, चंद्रकांतदादांचा काँग्रेसला सवाल


