Share

गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्या हुल्लडबाजांना राज्यसरकारचा दणका

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गडकिल्ल्यांवर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱयांना राज्य सरकारने दणका दिला आहे. आता गडकिल्ल्यांवर मद्यपान केल्यास अथवा बाहेरून मद्यपान करून गडकिल्ल्यांवर येऊन गैरवर्तन करणाऱ्या हुल्लडबाजांना सहा महिन्यांचा तुरुंगावास तसेच दहा हजार रुपयांपर्यंतच्या दंड ठोठावण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला आहे.

गेल्या काही काळात गडकिल्ल्यांकर दारूपाटर्य़ा करून धिंगाणा घालण्याचे प्रकार वाढले होते. महाराष्ट्रात साडेतीनशेच्या वर गडकिल्ले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्यांचे पावित्र्य भंग होऊ नये, या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम 85 अंतर्गत आता कारवाई करण्यात येणार आहे.

त्याचप्रमाणे शिक्षेबाबतच्या तरतुदी सर्व गडकिल्ले व पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागात जनतेच्या माहितीस्तव लावण्यात येणार आहेत. दारूबाजांवर पोलीस तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत कारवाई करण्यात येणार आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!