Share

नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध, राज्यमंत्री सत्तार यांची ग्वाही

Published On: 

औरंगाबाद : मराठवाड्यातील जवळपास सर्वच ठिकाणी गेल्या काही दिवसात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करुन तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी असल्याचे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही देखील सत्तार यांनी दिली आहे.

फूलंब्री तालुक्यातील कविटखेडा येथील गिरजा नदीवरील फुटलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याची सत्तार यांनी पाहणी केली. त्या वेळी ते बोलत होते. ते म्हणाल की, ‘झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी चिंता करु नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना मदत देण्यास राज्यसरकार कटिबद्ध आहे.’

फुलंब्री तालुक्यातही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. इथल्या शेतकऱ्यांनी सत्तार यांची भेट घेत त्यांना शासकीय मदत मिळण्यासंबंधी माहिती दिली. दरम्यान सत्तार यांनी शेतकऱ्यांना राज्य सरकार शेतकऱ्यांसोबत असल्याबाबत आश्वास्त केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजी पाथ्रीकर, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!