Share

सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी जिंकलोय- धनंजय मुंडे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार पलटवार केला. मुंडे यांच्यावरील कथित ऑडिओ क्लीपमुळे सत्ताधाऱ्यांनी आज धनंजय मुंडेना लक्ष्य केलं. मात्र मुंडेनी आपल्या खास शैलीत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ”बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण, कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे. आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप बाहेर काढणार.” असे मुंडेनी ठणकावून सांगितले.

धनंजय मुंडे म्हणाले, आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची क्लिप बाहेर काढणार.’’सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप माझ्यावर केले जात आहेत. २८ फेब्रुवारी २०१८ रोजी एका वाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभाग्रुहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र, तसे झाले नाही. अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार. या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण, कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे.

”मी इमानदारीने काम करूनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतोय. क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते.” असेहो मुंडे म्हणाले.

काय आहे प्रकरण

वसई –विरारमधील ग्लोबल सिटी प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक असणारे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकारात माहिती मागवून तब्बल १९ कोटींची सेटलमेंट केल्याची माहिती खुद्द यामध्ये मध्यस्थ असणाऱ्या प्रमोद दळवी नामक व्यक्तीने दिली आहे. याच घोटाळ्या संबंधीचा प्रश्न अधिवेशनात येणार होता. आता हा प्रश्न विचारला जाऊ नये यासाठी २ कोटींची अजून एक सेटलमेंट करण्यात आली. ज्या सेटलमेंटमध्ये विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना ५० लाख रुपये तर आमदार अनंत ठाकूर, राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता, मंत्रालयातील काही अधिकारी आणि वसई विरार महापालिकेतील अधिकाऱ्यांना उरलेले दीड कोटी देण्यात आल्याच दळवी यांनी सांगितल आहे. दरम्यान या सर्व सेटलमेंटबद्दलच्या ऑडियो देखील पुढे आल्या आहेत.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!