पारनेर : सध्या बहू चर्चित कोरोना आजाराच्या प्रसारासाठी अटकाव म्हणून राज्य सरकारने संपुर्ण राज्यात दि. 23 पासून संचारबंदी लागू केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर पोलीस प्रशासन आपल्याला दिलेल्या अधिकारा प्रमाणे शहरात व ग्रामीण भागात काम करत आहेत.
मात्र शहराप्रमाणे ग्रामीण भागातही लोकं प्रवास करण्याचे टाळत नसून गाफील पणे दुचाकीवर विनाकारण घराबाहेर पडत आहेत. यावर अटकाव आणण्यासाठी पारनेर तालुक्यातील बऱ्याच गावांमध्ये गावकरी कुणी प्रवाशी गावात येऊ नये म्हणून बाभळीचे फास रस्त्यावर टाकत आहेत.यात पारनेर तालुक्यातील बाबर मळा येथील ग्रामस्थांनी प्रथम पुढाकार घेऊन थेट रस्तेच बंद करण्याचे ठरवलेत.हे पाहून इतर गावांनीही पुढाकार घेऊन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.तर काही कच्चे रस्ते जेसीबी च्या साहाय्याने खणून ठेवले जात आहेत.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेने प्रशासनाच्या मुख्य नियमाचे पालन करणे गरजेचे आहे.तरच सर्व ह्या आजारातून बाहेर पडू शकतात.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

