Share

इंग्लंडला पराभूत करणाऱ्या टीम इंडियाच्या शिलेदारांनी नावावर केले हे विक्रम

Published On: 

चेन्नई- इग्लंड व भारतीय संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेचा दुसरा सामना भारतीय संघाने 317 धावांनी जिंकला.दुसऱ्या डावात अक्षर पटेलने इग्लंडचा निम्मा संघ माघारी धाडत विजयात मोठा वाटा उचलला. त्याने 60 धावा देत 5 बळी घेतले तर, आर अश्विनने देखील तीन बळी घेत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.

चेपॉकच्या खेळपट्टीवर 482 धावांच्या आव्हानांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ भारतीय फिरकीच्या जाळ्यात अडकला. चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राअखेर इंग्लंड संघानं सर्व गड्यांच्या मोबदल्यात 164 धावा केल्या करता आल्या. चार कसोटी सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.ऑल राऊंड कामगिरी करणारा आर. अश्विन या टेस्टचा ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला.

दरम्यान, या सामन्यात अनेक विक्रम पाहायला मिळाले.कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवण्याची भारताची ही एकूण सहावी वेळ होती. याआधी भारताने ५ वेळा ३०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांनी विजय मिळवला होता. तसेच धावांच्या तुलनेतील भारताचा हा ५ वा सर्वात मोठा कसोटी विजय आहे.

यासोबतच भारतामध्ये सर्वात जास्त टेस्ट मॅच (21) जिंकण्याच्या धोनीच्या विक्रमाची विराटनं बरोबरी केली आहे. धोनीच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं मायदेशात 30 पैकी 21 टेस्ट मॅच जिंकल्या. तीन गमावल्या तर सहा ड्रॉ झाल्या. धोनीच्या यशाची टक्केवारी ही 70 टक्के आहे. विराटच्या यशाची टक्केवारी ही 77.8 टक्के इतकी आहे. विराटच्या कॅप्टनसीमध्ये भारतानं होम ग्राऊंडवर एकूण 28 टेस्ट खेळल्या असून यामध्ये फक्त दोन टेस्ट गमावल्या आहेत. तर पाच टेस्ट ड्रॉ केल्या आहेत.

यासोबतच एका डावात इंग्लंडच्या ५ गड्यांना पव्हेलियनला पाठवत अक्षरने पदार्पणात बळींचा पंचक घेण्याचा किर्तीमान केला. विशेष म्हणजे, चेन्नईच्या मैदानावर कसोटी पदार्पणात हा पराक्रम करणारा तो केवळ दुसराच भारतीय डावखुरा फिरकीपटू ठरला आहे. तब्बल ४२ वर्षांआधी म्हणजे १९७९ मध्ये भारतीय दिग्गज दिलीप दोषी यांना हा किर्तीमान केला होता.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!