Share

अपंग कर्मचा-यांच्या पदोन्नतीचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार

Published On: 

अहमदनगर: शारीरीक व्यंगावर मात करीत अनेक अपंगांनी विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. योग्य संधी व पाठबळ मिळाल्यास अपंगही सर्वसामान्यांप्रमाणेच चांगले आयुष्य जगू शकतात.शासकीय सेवेत असलेले अपंग कर्मचारी विविध ठिकाणी काम करताना उत्कृष्ट काम करत असतात. नगर जिल्हापरिषद प्रशासनाने अपंग कर्मचा-यांच्या प्रश्नांची प्राधान्याने सोडवणूक केली आहे.अपंगांचे रोस्टर लवकरच पूर्ण करून पदोन्नतीचा प्रश्नही मार्गी लावू,अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अशोक कोल्हे यांनी दिली.

जागतिक अपंग दिनानिमित्त अपंग सप्ताह व कार्यशाळेत जिल्ह्यातील विविध संवर्गातील गुणवंत अपंग कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी, अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष दिगंबर घाडगे होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कोल्हे बोलत होते. याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीकांत अनारसे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन उबाळे, लेखाधिकारी मंगला वराडे, शिक्षक बँकेचे चेअरमन रावसाहेब रोहोकले ,गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे संचालक शरद सुद्रिक, बाबा पवार, अपंग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साहेबराव अनाप,अपंग कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन संतोष सरोदे, रमेश शिंदे, राधेशाम सपकाळे आदी मान्यवरांच्या उपस्थित १४ तालुक्यातील प्रत्येकी एक कर्मचा-यास गुणवंत अपंग कर्मचारी पुरस्कार तर ५ कर्मचा-यांना अपंग रत्न पुरस्कार व २ कर्मचा-यांना अपंग भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, प्रमाणपञ व सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप होते.

यावेळी बोलताना रावसाहेब रोहोकले म्हणाले की,जिल्हा परिषद प्रशासनाच्या सहकार्याने अपंग शिक्षक व कर्मचा-यांचे वाहनभत्त्यासह अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. डॉ.कोल्हे यांनी तर नेहमीच सर्व प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेवून ते सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.अपंग कर्मचा-यांचे उर्वरित प्रश्नही अशा सकारात्मक प्रतिसादामुळे लवकरच मार्गी लागतील,असा विश्वास आहे.संघटनेचे राज्य अध्यक्ष घाडगे म्हणाले की,अपंग दिन साजरा करताना सरकारने अपंगांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला हवी.राज्यात अपंगांची स्वतंत्र जणगणना करणे आवश्यक आहे.याशिवाय अपंगांच्या हक्कासाठी विधानपरिषदेत अपंगांचा किमान एक तरी प्रतिनिधी असायला हवा.यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.

मंदा भारमल(अकोले),प्रेमनाथ डोंगरे(संगमनेर),राजू आव्हाड,अनिल घोलप(राहाता),योगेश सूर्यवंशी(नगर),बन्सी घुले(पारनेर), चंद्रकांत रायकर(श्रीगोंदा),बळीराम जाधव(कर्जत),यशवंत माळी(राहुरी),खंडू बाचकर (महसूल), दत्तात्रय हजारे(शिर्डी),योगेश भागवत (कोपरगाव),दत्तु फुंदे(शेवगाव),रामकिसन डमाळे(पाथर्डी),प्रशांत दर्शने(श्रीरामपूर),विजय अंधारे(नेवासा),नारायण लहाने (जामखेड),सोमनाथ रोहोकले(मुख्यालय),अभिजित माने( जलतरणपटू विद्यार्थी),दिगंबर घाडगे पाटील(अपंग भूषण),उद्धव थोरात,संतोष सरवदे,एकनाथ वाडगे,दत्ताञय जपे यांना अपंग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!