Share

राणी पद्मावतीला नाचतांना दाखवणे खपवून घेणार नाही – रमेश शिंदे

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : प्राचीन काळी हिंदु परिवारातील कुलीन महिला या समाजापुढे नाचगाणे करत नव्हत्या, तर त्या वीरांगणा प्रसंगी हातात समशेर घेऊन मुघलांना नाचायला लावणा-या होत्या, असा इतिहास असतांना त्यात मोडतोड करून संजय लीला भन्साळी यांनी ‘पद्मावती’ चित्रपटातील ‘घूमर’ या गाण्यात राणी पद्मावतीला नाचतांना दाखवले आहे.

यापूर्वीही ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटात त्यांनी बाजीरावांची पत्नी काशीबाई यांनाही नाचतांना दाखवले होते. हा हिंदु वीरांगणांचा अपमान असून, तो हिंदु समाज कधीही सहन करणार नाही, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी म्हटले आहे.

स्वतःच्या मनाप्रमाणे इतिहासाची मोडतोड करून मसालेदार चित्रपट बनवून त्यातून कोट्यवधी रूपये कमवणा-या दिग्दर्शकांना कलेचे स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे लागू होत नाही. ‘घूमर’ हा नाच राजस्थानी संस्कृतीतील एक नृत्यप्रकार आहे आणि तो नाच करणारा एक विशिष्ट समाज आहे. हा नाच कोणत्याही राजकन्या वा राण्या या करत नव्हत्या, हे इतिहासाच्या आधारे चित्रपट बनवणार्‍या भन्साळींना का माहिती नाही?

आजकाल बॉलीवूडमध्ये गुंड आणि राजकारणी यांच्यासमोरही ‘आयटम साँग’मध्ये नाच करण्यासाठी अन्य ‘आयटम गर्ल’ आणल्या जातात. मग येथे ‘घूमर’ नाचच दाखवायचा होता, तर भन्साळी तेथे अन्य कोणीही कलाकार नाचताना दाखवू शकले असते, तेथे राणी पद्मावतीला नाचतांना दाखवण्याचे प्रयोजन काय ?

ज्या राणीने स्वतःच्या शीलरक्षणासाठी ‘जोहार’ (जिवंतपणी अग्नित प्रवेश) केला, अशा सत्शील राणीला नाचतांना दाखवणे, हा राणी पद्मावतीचा घोर अपमान आहे. याबद्दल भन्साळी यांनी याविषयी हिंदु समाजाची जाहीर माफी मागावी आणि राणी पद्मावतीने नाच केलेले काल्पनिक गाणे चित्रपटातून वगळावे, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

संजय लीला भन्साळी यांना महिलांबद्दल, मातेबद्दल आदर आहे, म्हणून ते वडिलांच्या जागी आईचे नाव लावतात. तर मग राणी पद्मावतीकडे माता म्हणून पाहणा-या हिंदु समाजाच्या आदरयुक्त भावना त्यांना समजू नयेत, हे दुर्दैव आहे. वाद निर्माण करून गल्ला भरायचा, हा आता या निर्मात्यांचा धंदा झाला आहे, हेच यातून सिद्ध होते, असेही शिंदे यांनी नमूद केले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!