औरंंगाबाद : कपडे खरेदीसाठी गेलेल्या तक्रारदार महिलेच्या बॅगमधून तिची पर्स लांबविल्याची घटना रंगारगल्ली येथील राधा मॅचिंग सेंटर या दुकानात घडली. खरेदी झाल्यावर पैसे देण्यासाठी पर्स काढत असताना हि बाब त्यांच्या लक्षात आली.
रंगारगल्ली येथे कपड्यांची खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेला चोरट्यांनी पळत ठेऊन दुकानातच संधी पाहून पर्स चोरली. खरेदीच्या ओघात असल्याने तक्रारदार महिलेला हा प्रकार सुरुवातीला लक्षात नाही आला. परंतु खरेदी झाल्यावर पैसे काढण्यासाठी पर्स घेत असताना. त्यांना ती मिळून आली नाही. वारंवार शोध घेऊन सापड नसल्याने त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला.
चोरट्याने तक्रारदार महिलेच्या बॅगमधील पर्ससह पाच हजारांचा मोबाइल आणि दोन हजार सहाशे रुपयांची रोख असा सात हजार सहाशे रुपयांचा ऐवज लांबवला. याप्रकरणी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई महापालिका निवडणुकीत मोठा विजय मिळवण्याचा निर्धार; रिपब्लिकन पक्षाची जय्यत तयारी
- खडसेंना चौकशीला बोलावल्याने राष्ट्रवादी आक्रमक; भुजबळ, मलिक, जयंत पाटलांचा भाजपवर हल्लाबोल
- लातूरमध्ये राष्ट्रवादीचा धमाका; भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी लावले गळाला
- नाथा भाऊंच्या पाठोपाठ मंदाकिनी खडसे यांनाही EDचं समन्स, खडसे कुटुंबाचा पाय आणखी खोलात
- ‘धर्मेंद्र, पाहा साहेबांनी डोळे मिटले’ ; दिलीप कुमार यांचे पार्थिव पाहून खचल्या सायरा बानो
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

