औंढा नागनाथ : श्री क्षेत्र औंढा नागनाथ ,जि. हिंगोली येथील पुण्यश्लोक महाराणी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्याचं ठरलं होत पण कोरोना मुळे ते शक्य झालं नाही. शिवसेना आता ११ मार्चला अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हे अनावरण केलं जाईल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिली.
दरम्यान, यावरून आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना आमने सामने आले आहेत. जेजुरीगडावरील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर पुन्हा एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाल्याचं समोर येत आहे. ‘गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना पुतळा अनावरणाला वेळ मिळत नसल्यानं आजही अहिल्यादेवींचा पुतळा प्लास्टिकमध्ये गुंडाळून दुर्लक्षितपणे उभा आहे. ते बहुधा माझं कुटुंब माझी जबाबदारी यात व्यस्त आहेत,’ असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
‘हि गोष्ट मनाला वेदना देणारी आहे. किरकोळ श्रेयवादासाठी लोकार्पण वर्षभर थांबवणं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींचा अपमान केल्यासारखं आहे. अहिल्यादेवी होळकरांचं कार्य राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. १६ मार्चला महापराक्रमी मल्हाररावजी होळकर यांची जयंती आहे. या दिवसांचं औचित्य साधून मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते दुपारी १ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येईल. मी येतोय, तुम्ही पण या! या कार्यक्रमाला सर्वांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक व्हावं,’ असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पक्वान्नाहूनही बळीराजाच्या घरातला आहार गोड लागतो’
- अमृता फडणवीसांचा ‘हा’ व्हिडिओ होतोय व्हायरल
- ‘आज इंदिरा गांधींची जागा नरेंद्र मोदी यांनी घेतली’
- ‘…इस सवाल का जवाब चाँद पे रहने वाले लोग भी दे सकते हैं ; अनुपम खेर यांनी घेतली ‘सोनी मॅक्स’ची फिरकी
- ‘आज देशाची परिस्थिती ‘आणीबाणी बरी होती’ असे म्हणावे अशीच आहे’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
